कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर हे कलेचे माहेरघर मानले जाते. त्या परंपरेत सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ पुन्हा नव्याने सुरू व्हावी यासाठी गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने यशवंत भालकर फौंडेशन आणि  अरूण नरके फौंडेशन यांच्या सहकार्याने नृत्यसंगम २०२१ ही ऑनलाईन नृत्यस्पर्धा घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा दुहेरी आणि समुह नृत्य अशी स्वरूपात ही स्पर्धा होणार आहे.   भगवान श्री कृष्ण यांच्यावरील गीतांवर ही नृत्यस्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत १२ वर्षां पुढील कलाकारांना यात सहभाग नोंदवता येणार आहे. ही स्पर्धा कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी परिसरातील कलाकारांसाठी मर्यादित होणार आहे. यामधून नवनवीन नृत्य कलाकार, नृत्य दिग्दर्शक मिळणार आहेत. तसेच यातून मिळणारा निधी हा गरजू कलावतांसाठी उभा करण्याचा प्रयत्न असल्याचे फौंडेशनतर्फे सांगण्यात

तसेच २७ ऑगस्ट रोजी कलाकारांनी आपले व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख असून प्राथमिक आणि अंतिम फेरी या दोन टप्यात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये विजेता-उपविजेता यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचे संग्राम भालकर यांनी सांगितले.

यावेळी सपना जाधव-भालकर, अध्यक्ष संदिप भालकर, विजय कांबळे, सैफ बारगीर, अशिष हेरवाडकर, अरविंद कोळी उपस्थित होते.