आता शहरातील बेवारस वाहने होणार टॅप

0
130

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाहतुकीस अडथळा होतो, अशा शहरातील बेवारस वाहने पोलीस प्रशासनाकडून टॅप करण्यात येणार आहे. तरी अशा वाहनांची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेस ९९२३७९९७०९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावी, असे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाने केले आहे.

शहरात वाहतुकीस अडथळा होवून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागू नये. यासाठी शहरातील दक्ष नागरिकांनी या ॲपव्दारे बेवारस वाहनांची माहिती देवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.