Published October 22, 2020

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रालयीन कर्मचारी आणि मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बॅंकेत जमा होणार आहेत. या बँकेकडून पोलिसांना आता लाखो नाही तर कोट्यवधींचे विमा संरक्षण मिळणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेशी झालेल्या कराराची मुदत संपल्यानंतर आता एचडीएफसी बॅंकेशी राज्य सरकारने करार केला आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. याची मुदत ३१ जुलै २०२० रोजी संपली. त्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते. त्यामधून भरघोस ऑफर देणाऱ्या एचडीएफसी बँकेची निवड करण्यात आली. मुंबई पोलीस आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार आता एचडीएफसी बॅंकेत जमा होणार आहेत. या बँकेकडून ११ लाखांच्या विम्यासह कुटुंबीयांतले पाच सदस्य झिरो बॅलन्स खाते उघडू शकतात,  नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास १० लाखांचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात अपंगत्व आल्यास ५० लाखांचे विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १० लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन एक हजार रुपये मदत अशा सुविधा मिळणार आहेत.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023