आता पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री घेणार लस..!

0
117

नवी दिल्ली  (प्रतिनिधी) : भारतामध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आता  या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

दरम्यान, १८  वर्षांपेक्षा लहान आणि ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे.  अशा लोकांना ही लस मिळणार नाही. मात्र अत्यावस्थ रुग्णांना ही लस द्यायची की नाही, याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार विचार करत  आहे. तर अॅलर्जी असणारे आणि गर्भवती महिलांना देखीलही लस देण्यात येणार नाही.