मुंबई (प्रतिनिधी) :  वाहतुकीच्या क्षेत्रात आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर औषधांच्या वितरणातही केला जातोय. ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ ही योजना सुरू झाली आहे. तेलंगणाच्या १६ ग्रीन झोनमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन केंद्रीय नागरी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.

मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, या प्रकल्पाच्या माध्यमातून औषधं दूरच्या भागात ड्रोनद्वारे पोहोचवली जातील. लस आणि इतर आवश्यक वस्तू ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागात सहज पोहोचवता येतात. या प्रकल्पाचा डेटा विश्लेषण तीन महिन्यांनी केले जाईल. यानंतर, नागरी उड्डयन मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, राज्य सरकार आणि केंद्र मिळून संपूर्ण देशासाठी एक आदर्श तयार करतील.

तसेच वाहतुकीच्या उद्देशाने हा आपल्या प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. विमानतळ आणि धोरणात्मक सुधारणांबाबत १६ कलमी शंभर दिवसांचा आराखडा तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.