आता ६ जूनला साजरा होणार ‘शिवस्वराज दिन’ : ना. हसन मुश्रीफ   

0
176

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक ६ जूनरोजी राज्यभर साजरा करण्यात येतो. परंतु यंदा हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे सकाळी ११ वाजता सर्वांनी गुढी उभारून अभिवादन करावे आणि महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रम करावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (सोमवार) येथे केले आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श राज्यकारभार होय. त्यांनी १७ व्या शतकात महाराष्ट्रात भूमीपूत्रांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या महापुरूषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ शिवराज्याभिषेक दिन होय. म्हणून यापुढे हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.