आता गोकुळ दुधाचे पॅकिंग कोकणात

0
38

कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आता कोकणातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे दूध पॅकिंग चालू केले  आहे. सध्‍या नेमळे, फोंडा या भागातून दररोज अंदाजे २२ हजार लिटर दूध संकलित होत असून, ते नाधवडेतील सिंधुभूमी डेअरी फार्म यांच्‍याकडे पॅकींग केले जाणार आहे.

भविष्‍यात या भागातील दूध उत्‍पादकांचे हित डोळयासमोर ठेवून दूध संकलनामध्‍ये वाढ करण्‍यासाठी संघाच्‍या सर्व सेवा-सुविधा, योजना दूध उत्‍पादकांना देण्‍यात येतील. दूध पॅकिंगच्या शुभारंभप्रसंगी गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक विश्वास जाधव, सिंधुभूमी डेअरी फार्मचे संस्थापक आमदार प्रमोद जठार,  गोकुळचे सर्व संचालक उपस्थित होते.