आता कोल्हापुरकरांना पाहायला मिळणार जयहिंदचा नवा ‘फॅमिली लूक’..!

0
26

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात गेल्या दहा वर्षांपासून नावाजलेल्या जयहिंदचा नवा अवतार आता पाहायला मिळणार आहे. पूर्वी फक्त पुरूषांच्या वस्त्रखरेदीसाठी पंचक्रोशीत सुप्रसिध्द असणारं हे नाव आता फॅमिली शॉपिंगसाठी देखील वाखाणलं जाणार आहे. कारण ‘जयहिंद’ आता नव्या रूपात आणि नव्या दिमाखात येत आहे.

याचे उद्घाटन २७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता राजारामपुरी चौकात असणाऱ्या १५ हजार स्क्वे. फुटांच्या आकर्षक शोरूमचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या नव्या रूपातल्या प्रशस्त शोरूममध्ये शॉपिंगसाठी तब्बल पाच मजले सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. या नव्या दालनाचं प्रमुख आकर्षण म्हणजे जयहिंदमध्ये आता जेण्ट्स वेअर सोबतच वूमन्स वेअर आणि चिल्ड्रन्स वेअरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जयहिंदचे हे नवं रूप आता संपूर्ण फॅमिलीला आकर्षित करणारं ठरेल यात शंकाच नाही.

पुरूषांसाठी फॉर्मल्स, कॅज्युअल्स, फॅब्रिक्स, बीस्पोक टेलरिंग व ॲक्सेसरीज्‌च्या नावीन्यपूर्ण व्हरायटी असणार आहेतच. पण त्यासोबतच कोल्हापुरातल्या महिलांना आवडतील अशा वैविध्यपूर्ण वस्त्रांची श्रेणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या पारंपारिक साड्यांपासून ते भारतीय शैलीतील विविध वस्त्रप्रकार असणार आहेत. रोजच्या वापरापासून ते सणसमारंभासाठीच्या पेहरावापर्यंत मोठी श्रेणी तुम्हांला इथे पाहायला मिळणार आहे.

त्याचबरोबर वेस्टर्न प्रकारांमध्येही फॅशन व ट्रेंड तुमच्यासाठी इथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबतच मुलांसाठी कॅज्युअल्स, वेस्टर्न व एथनिक प्रकारातील मोठी रेंज इथे असणार आहे. कोल्हापुरातील शाही समारंभासाठी जयहिंदचा ‘मेवार’ हा एथनिक वेअर ब्रँडही तुमच्यासाठी नव्या दिमाखात सज्ज झालेला आहे. मेन्स व वूमेन्स एथनिक वेअरसाठी इथे २ स्वतंत्र स्टुडिओज्‌ देखील असणार आहेत.

त्यामुळे आता कोल्हापुरातल्या संपूर्ण कुटुंबाची वस्त्रखरेदी ही आपल्या जयहिंदमध्ये करता येणार आहे. शुभारंभानिमित्त २७ ते २९ मे या काळात खास ऑफर देण्यात आलेली असून यामध्ये पाच हजार आणि पुढील खरेदीवर २५ टक्के किंमतीचे फ्री शॉपिंग व्हाऊचर्सही देण्यात येणार आहेत.

यावेळी जयहिंदचे संचालक दिनेश जैन यांनी, काळाप्रमाणे, वस्त्रखरेदीचाही ट्रेंड बदलताना दिसत आहे. ग्राहक संपूर्ण कुटुंबासोबत शॉपिंगला अधिक प्राधान्य देतात. तर एकाच ठिकाणी ही सगळी खरेदी व्हावी अशी ग्राहकांची मानसिकता आहे. त्यामुळेच कोल्हापुरातल्या पुरूष ग्राहकांना शॉपिंगचा आनंद देत असतानाच त्यांच्या कुटुंबासाठीही आपण आपले दालन सज्ज करून द्यावे. आणि कोल्हापुरातल्या कुटुंबांचे शॉपिंग जयहिंदमध्ये व्हावे याच विचारातून जयहिंदचे नवे रूप आम्ही कोल्हापुरकरांसमोर आणले आहे.

तरी कोल्हापुरकरांनी या शोरूमच्या शुभारंभास २७ मे रोजी यावे आणि या शोरूमचा अनुभव तसेच शुभारंभ ऑफरचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जयहिंदचे संचालक दिनेश जैन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.