आता गोपीचंद पडळकरांचे शरद पवारांनंतर मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान

0
211

मुंबई (प्रतिनिधी) : जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावर करण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हान दिले होते. आता पडळकरांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्याने पुन्हा एकदा  राज्यात राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या १६ मार्चरोजी औंढा नागनाथ येथे आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण आम्ही करणार आहोत, असे पडळकरांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी पुतळ्याचे अनावर करण्यासंदर्भातील कार्यक्रमपत्रिकाही छापली  आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री ठाकरे यांना पुतळ्याचे अनावर करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे सर्व समाजाच्या वतीने येत्या १६ तारखेला औंढा नागनाथ येथील आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत, अशी घोषणा  पडळकर यांनी केली आहे.