आता अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’च्या मैदानावर..?

0
75

मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अर्जुनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ मध्ये पदार्पण केल्याने आयपीएलच्या लिलावात सामील होण्यासाठी तो पात्र ठरला आहे. बीसीसीआयने खेळाडूंची नावे लिलावात पाठविण्यासाठी काही नियमावली केली आहे. त्यानुसार आता अर्जुन तेंडुलकरला ऑनलाईन नोंदणी प्रणालीमध्ये लॉग इन करावे लागेल आणि आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी आपली आवड दर्शवावी लागणार आहे. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून उर्वरित औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.

दरम्यान, अर्जुनकडे आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा नेट गोलंदाज म्हणून पाहिले जातो. तो नेट गोलंदाज म्हणून टीम इंडियाशी देखील जोडलेला आहे. टी-20 स्पर्धेत अर्जुनने यावेळी मुंबई संघाकडून दोन सामने खेळले आहेत.