आमच्याकडे आता सगळं हाऊसफुल : उद्धव ठाकरे

0 46

अहमदनगर (प्रतिनिधी) : आमच्याकडे आता सगळं हाऊसफुल झालंय सर्व चांगले लोक आमच्याकडे आलेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत, त्यामुळे तुमचा विस्तवं पेटतोय का ते बघा. जे काही तुमचे पाच दहा निवडून येतील ते तरी आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का ? याचा विचार करा, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. ते संगमनेरमध्ये साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देणार असल्याचे विरोधक सांगत आहेत. मात्र, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी सर्वप्रथम आम्हीच केली होती. आताही बेकारांना संधी आम्ही देणार याच्यासाठी आम्ही काम करतोय. मात्र, आता शरद पवारांसह विरोधक बेकार झाले आहेत. त्यामुळे त्यांना बेकारी काय असते हे आता कळले आहे. विरोधी पक्षनेते असतानाही सरकारच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही युतीच्या परिवारात आलात याला धाडस लागतं, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटलांना मी धन्यवाद देतो, असेही ते यावेळी म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्याच्या विकासकामांबरोबर शेतकऱ्यांसाठी आपण योजना करणार असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, नगरमध्ये आता आम्ही पाणी आणणार आहोत, या पाण्यामध्ये विकासाचं प्रतिबिंब दिसेल. पाच वर्षात मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन दाखवणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही केवळ कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करणार आहोत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More