नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  कुख्यात गँगस्टर छोटा राजन याचा दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राजनला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी त्याला एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, आज (शुक्रवार) त्याचे निधन झाले आहे. छोटा राजन सध्या तिहार तुरूंगात शिक्षा भोगत होता. 

छोटा राजन १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता. छोटा राजनचं खरं नाव राजेंद्र निकाळजे असं होतं.  २०१५ साली इंडोनेशियातील बाली येथून राजनला प्रत्यार्पन करून भारतात आणण्यात आलं होतं. तेव्हापासून तो दिल्ल्लीतील तिहार तुरूंगात शिक्षा भोगत होता.