राज ठाकरेंना नोटीस : कार्यकर्त्यांनी फोडले ‘अॅमेझॉन’चे कार्यालय

0
79

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून आज (शुक्रवार) तोडफोड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  

मनसेच्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने न्यायालयात तक्रार केली होती. त्यानंतर दिंडोशी कोर्टाने राज ठाकरे यांना नोटीस पाठवून ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. याचे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ॲमेझोनला आव्हान दिले आहे.

दरम्यन, अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी मराठी भाषेत अॅप सुरू करावे, अन्यथा मनसे स्टाईलने  उत्तर देण्याचा इशारा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.