नांगनूर ग्रामपंचायत सदस्यास नोटीस

0
730

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी कांबळे यांना तिसरे अपत्य प्रकरणी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीस हजर राहण्याची नोटीस काढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार मैमुन्निसा संदे यांनी ही नोटीस दिली आहे.

नांगनूरची ग्रामपंचायत निवडणूक २०१८ मध्ये झाली. त्यावेळी लक्ष्मी कांबळे या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून आल्या. दरम्यान, त्यांना तिसरे अपत्य झाले. यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावी, अशी याचिका विरोधी सदस्य नेमिनाथ तेरदाळे यांनी अॅड. आप्पासाहेब जाधव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली. याप्रकरणी सुनावणीसाठी कांबळे यांना नोटीस काढण्यात आली आहे. सुनावणीनंतर अपात्रतेसंबंधी निर्णय होणार आहे.