वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम

0
65

वारणानगर (प्रतिनिधी) : आर्थिक दुर्बल कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी वारणानगर (ता.पन्हाळा) येथे ‘नो शेव्ह’ मोहिमेचे नोव्हेंबर महिन्यांमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधव आणि त्यांचे सहकारी ही मोहीम गेल्या दहा वर्षांपासून राबवित आहेत.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला तोंड देताना उपचारांचा खर्च प्रचंड असल्याने कॅन्सरग्रस्त कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय होते. अशा कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यांत दाढी करायची नाही आणि त्याचे वाचलेले पैसे एकत्र करुन महिन्याच्या शेवटी कॅन्सरग्रस्त कुटुंबांना ही आर्थिक मदत केली जाते. या मोहिमेस आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.