‘लस कोणी घेऊ नये’ : ‘बायोटेक कंपनी’च्या महत्त्वाच्या सूचना

0
318

मुंबई (प्रतिनिधी) : भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन लसीसंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये कंपनीने काही विशिष्ट आजारांवर उपचार घेणाऱ्यांनी ही लस घेऊ नये, असं स्पष्ट केलं आहे. गरोदर महिला, किमोथेरपीसारखे उपचार सुरु असणारे रुग्ण, रक्त पातळ करण्यासाठी औषध घेणारे रुग्ण यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

भारत बायोटेकच्या वतीने गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या असून त्यामधून काही आजार असणाऱ्या, तसेच गरोदर महिलांनी लस घेऊ नये असे स्पष्ट केले आहे. ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनी कोवॅक्सीन घेऊ नये असे म्हटले आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी देखील कोवॅक्सीन घेऊ नये. याव्यतिरिक्त गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच, नवजात बालकांच्या मातांनीही लस घेऊ नये, असे सांगण्यात आले आहे.