राज्यात रात्रीची संचारबंदी, लॉकडाऊन करण्याची गरज नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
91

मुंबई (प्रतिनिधी) :  नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावेळी रात्रीची संचारबंदी लागू होणार अशी सर्वत्र चर्चा होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी आणि पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची गरज नाही, असं स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (रविवार) जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काही जणांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे सूचवले आणि कांही जणांनी पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचे सांगितले आहे. पण मला वाटत नाही की, रात्रीची संचारबंदी आणि लॉकडाउन पुन्हा लागू करण्याची गरज नाही अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्यास नकार दिला आहे.