मुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही,  भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा. ही काही नवीन गोष्ट नाही, अशा प्रतीइशारा  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्यांचे पुत्र आमदार नीतेश राणे  यांनी ‘करारा जवाब मिलेगा’  अशा आशयाचा एक व्हिडिओ ट्वीट केला होता. तसेच भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनीही पत्रकार परिषद घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.  तसेच सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करू,  अशी धमकी  शेलार यांनी दिली होती.  भाजप नेत्यांच्या या इशाऱ्यांचा व धमक्यांचा मंत्री मलीक यांनी खरपूस  समाचार घेत  भाजपला प्रतिइशारा दिला आहे.