जयसिंगपूर येथील पायस हॉस्पिटलमध्ये कुठलीही स्फोटके मिळाली नाहीत : बीडीडीएस पथक

0
552

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जयसिंगपूर येथील पायस हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचे भासवून कोणीतरी खोडसाळपणा केला आहे. बीडीडीएस कोल्हापूरच्या पथकाने याबाबत सखोल पाहणी केली आहे. या वस्तूंमध्ये प्लास्टिकचे छोटे पाईप गुंडाळून ठेवलेले मिळून आलेत. तसेच त्यामध्ये कोणतेही स्फोटके मिळून आली नाहीत. तरी नागरिकांनी असल्या कुठल्याच अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन कोल्हापूर पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

हा कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे पुढे आले आहे. खोडसाळपणे ज्याने हे बॉम्बसदृश्य वस्तू ठेऊन लोकांमध्ये गैरसमज आणि भिती पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की असल्या अफवांवर विश्वास ठेवू नये.