बहिरेश्वर गावच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

0
33

सावरवाडी (प्रतिनिधी) : सरपंचाचा मनमानी कारभार आणि ठरलेल्या वेळी सरपंचानी राजीनामा न दिल्याने बहिरेश्वर (ता. करवीर) गावच्या  सरपंच साऊबाई बचाटे यांच्यावरील अविश्वासदर्शक ठराव १० मतांनी मंजूर  करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सभागृहात सदस्यांच्या व्यापक बैठकीत या  अविश्वास ठरावावर मतदान झाले. करवीरच्या तहशिलदार शितल भांबरे-मुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

गावच्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. स्थानिक नेत्यांच्या सूचनेनुसार  ठरलेल्या वेळी सरपंच पदाचा राजीनामा सरपंच बचाटे यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठी  नाराजी निर्माण झाली होती. त्यातून सदस्यांनी सरपंचावर अविश्वास दाखल केला होता.  ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे एका  ग्रामपंचायत सदस्याचे निधन झाले होते.  ग्रामपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा घेऊन मतदान घेण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत दहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनी मतदान केले . एक विरोधी दहा अशा मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला . यावेळी मंडल अधिकारी प्रवीण माने , तलाठी पुरुषोत्तम ठाकूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपूते आदि उपस्थितीत होते. बहिरेश्वर गावच्या ग्रामपंचायती मध्ये कॉग्रेस पक्षांतर्गत तीन गट एकत्र आहेत, सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला गटाचे होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here