खेडे-मुंगुसवाडीच्या सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल…

0
557

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील खेडे-मुंगुसवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रुपाली महेश आरदाळकर यांच्यावर ९ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. तहसीलदार विकास अहिर यांचेकडे ठराव दाखल केला आहे. लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल होण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने याची विशेष चर्चा सुरू आहे.

मनमानी कारभार करणे, सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे अशी दोन करणे अविश्वास ठरावात नमूद केली आहेत. संगीता शिंदे, शारदा सावंत, विजय पालकर, प्रकाश चव्हाण, शोभा लकमले, ज्योती सावरतकर, श्रीपती नरके, संदीप पाटील, स्मिता गोडसे या नऊ सदस्यांनी हा ठराव दाखल केला आहे. सरपंच लोकनियुक्त असलेने विशेष गावसभेत या ठरावावर चर्चा होऊन ठरावावर मतदान घेण्यात येईल. ही प्रक्रिया तहसीलदार व गटविकास अधिकारी राबविणार आहेत. या ठरावामुळे तालुक्यात विशेष चर्चा सुरू आहे.