आजरा (प्रतिनिधी) : आजरा पंचायत समितीचे सभापती उदय पवार यांच्यावर चार सदस्यांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली अधिकृत माहिती अशी की, ठरल्याप्रमाणे पवार यांना १० महिने, सदस्य बशीर खेडेकर यांना ८ महिने तर उर्वरित ६ महिने सदस्य शिरीष देसाई यांना सभापती करण्याचे ठरले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे पवार यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे उपसभापती वर्षा बागडी, सदस्य बशीर खेडेकर, शिरीष देसाई, वर्षा कांबळे या चार सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या ६ पैकी ५ सदस्य राष्ट्रवादीचे असून १ सदस्य अपक्ष आहे.