मानव कल्याणकारी संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी नितीन सणगर

0
112

टोप (प्रतिनिधी) : पेठवडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन सणगर यांची कोल्हापूर मानव कल्याणकारी संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली.

साहिल मुजावर (मलकापूरकर) यांच्या प्रयत्नाने व सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज (रविवार) त्यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सलिम पटेल यांनी दिले. निवडीचे पत्र साहिल मुजावर यांच्या हस्ते देताना जीवन सुतार, सचिन शिंदे, सद्दाम मुजावर, विश्वजित माने आदी उपस्थित होते.