मुलगी, जावयाची काळजी आम्ही घ्यायची : निर्मला सीतारामनचे राहुल गांधींना उत्तर

0
93

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हम दो, हमारे दो याचा अर्थ असा आहे, दोन व्यक्ती पक्षाची चिंता करत आहेत आणि आणखी दोन व्यक्ती आहेत, मुलगी आणि जावई. ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे. पण, आम्ही असे करत नाही. सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेतंर्गत ५० लाख स्ट्रीट वेंडर्संना एका वर्षांसाठी १० हजार कोटी रूपये देण्यात आले. ते लोक क्रोनी भांडवलदार नाहीत, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लगावला आहे.

अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. ‘हम दो, हमारे दो’ म्हणत चार लोक देशाला चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपाला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

सीतारामन म्हणाल्या की, अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्रीय असल्याचा हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून, गरीबांना मदत करणारा आहे. अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळणार आहे. असा दावा करून सीतारामन यांनी आकडेवारी वाचून दाखवत विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. दोन लोक पार्टीची काळजी घेतायेत आणि आणखी दोन लोक आहेत, ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे, असे म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.