कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात इतरत्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे नऊ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरात ५ बाधित असून, करवीर, इचलकरंजी, कुरुंदवाड व जयसिंगपूर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजवर एकूण २ लाख २० हजार ३८१ बाधित रुग्ण आढळले असून, एकूण २ लाख १४ हजार ४४८ रुग्ण कोरोनामुक्त झाला आहेत. आतापर्यंत एकूण ५९११ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या फक्त चार रुग्ण उपचार घेत आहेत. आज ९४ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.