इचलकरंजीतील महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरणी नऊ जणांना पोलीस कोठडी…

0
98

इचलकंरजी (प्रतिनिधी) : थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे इचलकरंजीतील महावितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड काल (शुक्रवार) केली होती. त्याकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, योगेश दाभोळकर, साहिल कोकटनूर, कृष्णा कोपार्डे, सुभाष शेंडे, रोहित कोतकर, वरद फातले, बबलू उर्फ प्रशांत कांबळे, प्रमोद भाटले यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आज (शनिवार) न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या संशयितांना दुपारी मोठेतळे ते न्यायालयापर्यंत चालवत नेल्याने मनसे जिल्हा संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांनी पोलिस अधिकार्‍यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर पोलिसांकडून गाडी बंद पडल्याचे कारण सांगण्यात आले. तर गुन्हा दाखल झालेले पदाधिकारी न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सर्वांवर फुलांची उधळण करत स्वागत करुन जोरदार घोषणा दिल्या.