चंगू-मंगूच्या फालतू गप्पांमध्ये रस नाही… : निलेश राणे

0
115

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली असून ती मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचा प्रोमो शेअर केला आहे. या वेळी संजय राऊत यांनी उद्या धमाका होणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका करीत चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला कसलाच रस नसल्याचं म्हटलं आहे.

या मुलाखतीच्या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर निशाणा साधला आहे. “ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही अशा फुकट्या लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगूच्या फालतू गप्पा,” अशी टीका त्यांनी केली.