नाईट क्लबवर छापा: सुरेश रैना, सुझेन खान यांच्यावर गुन्हा

0
151

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा  टाकून भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना,  अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान यांच्यासह ३४ सेलिब्रेटींवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहारा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता केली.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कोरोनाशी संबधित नियमांचे पालन न केल्याने तसेच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजातून पळून गेले आहेत. त्यांचा  पोलीस शोध घेत आहेत. तसेच क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने सोमवारी मुंबईत नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. त्याचदिवशी मध्यरात्री  कारवाई करण्यात आली आहे. राज्यात आजपासून (मंगळवारी) रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.