कातर : फिफा विश्वचषक स्पर्धा सुरु असताना ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार पायाच्या दुखापतीमुळे काही सामने तो विश्रांतीवर होता; पण आता तो दुखापतीतून सावरल्यानंतर ब्राझीलकडून दक्षिण कोरियाविरुद्धच्या विश्वचषकाची बाद फेरीच्या सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. त्याने पुन्हा सराव सुरू केला आहे.

सर्बियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो सरावासाठी आला नव्हता. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. आता ६ डिसेंबरला ब्राझीलचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. त्यापूर्वी नेमारने सराव सुरु केला आहे. ब्राझीलच्या या स्टार फुटबॉलपटूने ट्वीटमध्ये ‘मला आता बरे वाटत आहे.’ असे लिहीत काही फोटोही शेअर केले आहेत.