महिला दिनानिमित्त अंध भगिनींसाठी जेऊर येथे आगळा उपक्रम

0
19

पन्हाळा (प्रतिनिधी) : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आणि अंध युवा मंच या संस्थेच्या अंध भगिनींसाठी मसाई पठार, जेऊर येथील अॅडव्हेंचर पार्क येथे आज (सोमवार) एका आगळ्यावेगळ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाच्या सान्निध्यात साहसाचा अनुभव व सांस्कृतिक कार्यक्रम व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

पन्हाळा नगराध्यक्ष रुपाली धडेल यांनी शिबिराचे उद्घाटन केले. या वेळी अंध महिलांकडून साहसी खेळातील प्रकार करून घेण्यात आले. दुपारच्या वेळी ह्या भगिनींना नृत्य परिषदेतर्फे नृत्यविशारद सागर बगाड़े यांनी नृत्यातील काही प्रकार शिकवले. या उपक्रमात ३० अंध भगिनींनी सहभाग घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

या वेळी नगरसेविका पल्लवी नायकवडी, माधवी भोसले, अशीकी राऊत, हृषिकेश केसकर प्रमोद पाटील, पार्थ शाह, विनोद कांबोज आदी उपस्थित होते