टोप (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनामुळे वृतपत्र विक्रेत्यांना मोठया आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारने वृतपत्र विक्रेत्यांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत व स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा करावी. अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटील आणि हातकणंगले वृतपत्र एजंट विक्रेता संघाने सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोइटे यांच्याकड़े निवेदनाद्वारे केली आहे. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी, वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र व्यवसातील महत्वाचा घटक असून तो असंघटित आहे. तसेच त्याचे लॉकडाऊनच्या काळात मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्याला या मधून बाहेर येण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून त्यासाठी त्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केल्यास यातून त्याचे जीवन सुखकर होणार असल्याचे सांगितले. तसेच या सर्वासाठी मदत मिळावी म्हणून सुमारे ३०७ वृत्तपत्र विक्रेत्यांची यादी आज सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडे जमा करण्यात आली.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष डुणूंग, सचिव आण्‍णासो पाटील, खजिनिस राजू शिंदे, संदीप दाभाडे, तसेच पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघाचे उपाध्यक्ष कॉ. शिवगोंडा खोत, काँ. आण्णा गुंडे, शिवानंद रावळ, महेश बावळे, अमर मुसंडे, नारायण शिदे, भालचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.