कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट : आ. चंद्रकांत जाधव

0
96

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा. या मागणीसाठी महापालिकेचे सर्व कर्मचारी आज (गुरुवार) सायंकाळनंतर संपावर जाणार होते. परंतु, आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिका प्रशासन, महापालिका कर्मचारी संघटनांची तातडीने बैठक घेतली.

या बैठकीत उद्या (शुक्रवार) पासून या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. याचा फायदा महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या बैठकीला प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त  निखिल मोरे, संघटनेचे अध्यक्ष संजय भोसले, अजित तिवले, अभिजीत सरनाईक आदी उपस्थित होते.