मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना परस्थिती नियंत्रणात आली असून रूग्णांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रतिबंधात्मक नियम शिथिल केले आहेत. परंतु कोरोनाबाबत राज्य सरकारने नव्याने नियम जाहीर केलेले आहेत. 

– लसीकरण पूर्ण झालेल्यांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यास परवानगी.

– मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करायचा असेल, तर दोन डोस घेणे बंधनकारक

– कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची व्याप्ती वाढवण्याचा  निर्णय

– रिक्षा, टॅक्सीतून प्रवास करताना मास्क गरजेचा, अन्यथा प्रवाशाला आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.

– दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल, तर ग्राहकाला ५००, तर संबंधित दुकानदाराला १० हजार रुपये दंड आकारला जाणार.

– मॉल्समध्ये ग्राहकांनी मास्क घातला नसेल, तर मॉल्स मालकाला ५० हजार रुपये दंड आकारला जाणार.

– राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी, मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर ५० हजार दंड आकारला जाणार.

– वानखेडे स्टेडियममध्ये ३ ते ७ डिसेंबरदरम्यान होणार्‍या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थिती राहण्यास परवानगी.