नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र महागाई वाढली आहे. मात्र या काळात डिसेंबर महिन्यात एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतींबाबत सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाही आहेत. १ डिसेंबरपासून हे नवे दर लागू होत आहेत.

जुलै २०२० महिन्यात १४ किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत साधारण ४ रुपयांपर्यंत वाढली होती. देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी IOC च्या वेबसाईटच्या मते मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. मुंबईमध्ये १४.२ किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत ५९४ रुपयांवर स्थिर आहे. जून आणि जुलै महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. पण ऑगस्टपासून किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.