आदमापूर येथील अमावस्या यात्रा रद्द

0
237

राधानगरी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्री बाळूमामाची गुरुवारी (दि.११)  होणारी अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली. 

गुरूवारी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु नित्यनेमाने पूजाअर्चा करण्यात येणार आहे. परंतु भक्तांना मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील, राज्यातील भक्तांनी याची नोंद घ्यावी. तसेच मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांचा पुढील आदेश येईपर्यंत इतर दिवशी सकाळी ८ ते ५ यावेळेत सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन घेता येणार आहे, असे धैर्यशील भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारी होणारी अमावस्या यात्रा रद्द करण्यात आल्याने  व्यापारी वर्गांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यात्रा रद्द करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन व्यापाऱ्यांच्या वतीने भुदरगड तहसीलदारांना देण्यात आले आहे.