कृषि कायद्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट : नामदेवराव  गावडे  

0
81

सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या नव्या कृषि कायद्यामुळे देशातील शेतीव्यवसाय कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव शेतकऱ्यांनी उधळून लावावा. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे महासचिव नामदेवराव गावडे यांनी केले. ते करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे शेतकरी संघर्ष समन्वयक समितीतर्फ आयोजित शेतकरी सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी  रघुनाथ वरुटे होते.

गावडे म्हणाले की, राज्यसभेत बहुमत नसतांना मोदी सरकार तीन नवे कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटीत लढा उभारला पाहिजे. त्यासाठी शेतकरी आंदोलनाला  त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठींबा द्यावा, असे आवाहन केले. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष वाय एन पाटील यांनी, देशात शेतकऱ्यांचे प्रश्न वाढत आहेत. परंतु, याकडे केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले.

यावेळी नामदेवराव पाटील, संजय पाटील, उपसरपंच सुर्वणा दिंडे,  सिताराम पाटील, बाबा ढेरे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.