नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहतुकीच्या पायाभूत सुविधा करण्यासाठी नवीन कॉरिडॉरची घोषणा केली आहे. शहरी भागात बस वाहतुकीच्या १८ हजार कोटी रुपयांच्या योजनेला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पाची घोषणा करताना त्यांनी सांगितले.

शहरी भागात सार्वजनिक, सरकारी भागीदारीतून २० हजार बस सुरू करण्यात येणार आहे. ७०२ किमीच्या मेट्रो सुरू करण्यात येईल. १०१६ किमी आणि आरआरटीचे काम २७ शहरांत सुरू करण्यात येईल. मुंबई-कन्याकुमारी कॉरीडोरसाठी तरतूद करण्यात आली आहे. रस्ते मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटींची तरतूद केली आहे. बहुतांश बंदरे ही खासगी क्षेत्राकडे देण्यात येणार आहेत. आसाममधील रस्त्यांसाठी अतिरिक्त ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ५ हजार कोटी रस्ते विकासासाठी तरतूद केली आहे. विमानतळांचा विकास केला जाणार आहे. ३ हजार किलोमीटरचे रस्ते भारतमाला प्रकल्पा अंतर्गत बांधल्यात  येईल. मुंबई कन्याकुमारी ६०० किमीचा रस्ता, ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. २५ हजार कोटीचे रस्ते प. बंगालमध्ये खर्च केले जाणार आहे.