कासारवाडीच्या उपसरपंच पदी नेताजी चेचरे यांची निवड…

0
312

टोप (प्रतिनिधी) :  कासारवाडीच्या उपसरपंच पदी नेताजी चेचरे यांची निवड करण्यात आली. माजी उपसरपंच साधना खाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. याच्या निवडीसाठी आज (सोमवार) विषेश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्ष स्थानी लोकनियुक्त सरपंच शोभाताई खोत होत्या.

यावेळी निर्धारित वेळेत नेताजी आनंदराव चेचरे व शिला श्रीरंग खाडे असे दोन अर्ज दाखल झाले होते. यावेळी हात वर करुन मतदान करण्यात आले. यानंतर नेताजी चेचरे यांना पाच तर शिला खाडे यांना पाच समान मते मिळाली. यावेळी लोकनियुक्त सरपंच यांनी आपल्या निर्णायक मताचा वापर केला आणि चेचरे यांना आपले मत दिले. यामुळे चेचरे यांना सहा मते मिळाल्याने नेताजी चेचरे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले.

या सभेला सदस्य आनंदा पोवार, आनंदा खोत, सुर्यकांत कुंभार, वैशाली वरुटे,  मनिषा यादव, साधना खाडे, अनिता वागवे उपस्थित होते. यावेळी सचिव म्हणून ग्रामसेवक प्रभाकर परिट यांनी कामकाज पाहिले.