बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघासला सुवर्णपदक

0
9

दिल्ली : येथे सुरु असलेल्या वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 48 किलो वजनी गटात नीतू घंघास हिने मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंग हिचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. 

बॉक्सर नीतू घंघास हिने लुटसेखर अलतेंगसेंग हिचा 5-0 ने दारुण पराभव केला. याआधी नीतू घंघास हिने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. याशिवाय भारताला आणखी तीन महिला बॉक्सरकडून सुवर्णपदाची अपेक्षा आहे. यामध्ये स्विटी बुरा, निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन या बॉक्सरचा समावेश आहे.

नीतू घंघास हिच्यानंतर भारतीय चाहत्यांच्या नजरा स्विटी बुरा हिच्या सामन्याकडे आहे. स्विटी बुरा वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिपच्या अंतिममध्ये पोहोचली आहे.  रविवारी निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन यांच्या सामन्याकडेही चाहत्यांच्या नजरा आहेत. या दोघींकडूनही भारतीयांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.