सावरवाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात सहकाराची प्रगती करण्यासाठी येथे सहकार रुजवणे गरजेचे आहे. असे मत शेतकरी संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील यांनी व्यक्त केले. ते करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे शेतकरी संघाच्या नवीन शाखेच्या उद्घाटनवेळी बोलत होते.

पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात विविध सहकारी संस्था उभ्या करून लोकांच्या हाताला काम दिल्यामुळे ग्रामीण भागाचा सहकार हा वृद्धिगंत होत चाललेला आहे. ग्रामीण भागात सहकार रुजवून तो वाढवण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. त्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. शेतकरी संघाने येथे नवीन शाखा सुरू करून येथे सर्व वस्तु आणि रासायनिक खत उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जि.प. सदस्य सुभाष सातपुते, सरपंच साऊबाई बचाटे, उपसरपंच सुवर्णा दिंडे, सिताराम पाटील, रघुनाथ वरुटे, शिवाजी चव्हाण, तानाजी गोदडे, चंद्रकांत दिंडे, ग्रामपंचायत सदस्य, कोठेश्वर विकास सेवा संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.