पुणे (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी पुणे पोलिसांनी स्वराज्य संस्था, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगातील आदर्श आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ते आज पुणे दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी राजभवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे होते. राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि कार्यकर्त्यांनी राज्यपालांना राजभवनावर काळे झेंडे दाखवले. यावेळी ‘राज्यपाल गो बॅक’ अशा घोषणा देण्यात आल्या. या सगळ्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पुणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष प्रशांत जगताप जबाबादार असतील, अशी नोटीस पुणे पोलिसांनी बजावली होती.