धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावर राष्ट्रवादीने दिली प्रतिक्रिया

0
165

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीकडून बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

मलिक यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची तक्रार आल्याने पोलीस निश्चित रूपाने याची चौकशी करतील. आरोप केलेल्या महिलेच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांचे लग्न झाले आहे. त्यांची दोन मुलेही आहेत. त्यांचे नावही मुलांना दिले आहे. आता त्यांची बहीण पुढे आली आहे. हा त्यांच्या कुटुंबातील विषय आहे. घरातील काय विषय आहे, यावर धनंजय मुंडेच बोलू शकतील. पण त्यांच्या बहीण या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत ही खरी गोष्ट आहे. कौटुंबिक विषय असताना जे काही आरोप होतात त्यावर पोलीस तपास करतील. चौकशीत जे काही सत्य आहे ते समोर येईल, असेही ते म्हणाले.