ईडीचा वापर करून दहशत पसरवायचं काम केलं जातंय : शरद पवार

0 37

मुंबई (प्रतिनिधी) : जे लोक आम्हाला मदत करतात त्यांच्यात आज दहशत पसरली आहे. त्यांना बोलायचं असलं तरी त्यांची तयारी नसते. ईडी, सीबीआयचा सातत्यानं वापर करून दहशतीचं वातावरण तयार करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे आम्हाला मदत करणारी लोकंही दूर जात असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शरद पवार यांनी राज्यातील बेरोजगारी, शेती व्यवसाय, पक्षातील दिग्गजांनी पक्षाची साथ सोडणं अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आज मला महाराष्ट्राची काळजी वाटते. महाराष्ट्रातील जनतेनं मला खुप काही दिले. गेली ५२ वर्ष मला संधी दिली. अशा वेळी आज राज्य अडचणीत आहे. राज्यातील शेती, उद्योग अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत ज्या राज्याने आपल्याला इतकी शक्ती दिली त्या राज्याचं सध्याचं चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.

मध्यंतरीच्या काळात अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. परंतु यातून मला नवं नेतृत्व तयार करण्याची संधी मिळाली. नव्या नेतृत्वाच्या कामावर विश्वास आहेच. परंतु त्यांना प्रोत्साहित करावे, यासाठी मी सहभाग घेत आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More