हजारो शेतकऱ्यांची आत्महत्या हे सरकारचं पाप : अजित पवार

0 39

सोलापूर (प्रतिनिधी) : सरकार शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसेही देत नसून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सरकारचे पाप आहे. सरकारला शेतीतलं काही कळत नाही. रोग कोणता आहे हेच त्यांना कळत नाही,”असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केलं. वेळारपूर येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या उत्तम जानकर यांना माळशीरसमधून उमेदवारी देण्यात आली आहे. “गेले अनेक वर्ष राजीनामे शिवसेनेच्या खिशात आहेत. आता त्यांचं कोणीही ऐकतही नाही आणि ते केवळ नुसतं आम्ही बघून घेतो असं म्हणताना दिसतात,” असा शिवसेनेवर निशाणा साधला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More