औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे सरकारकडून वारंवार सुरक्षित वावराचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. ही लस कधी मिळणार हे निश्चित नसले तरी राज्य सरकारने मात्र सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. ते आज (शनिवार) औरंगाबादमध्ये बोलत होते.

मलिक यांनी सांगितले की, बिहारमध्ये मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे देशाच्या इतर लोकांवर हा अन्याय आहे. खरं तर योग्य वेळी देशाच्या सीमा बंद केल्या असत्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळला असता आणि लॉकडाऊन सुद्धा करावे लागले नसते. केंद्राने जरी नाही दिली तरी महाराष्ट्रात कोरोनाची लस नागरिकांना मोफतच देण्यात येईल.