भोसले नाट्यगृहातील समस्या सोडवा : नाट्य परिषदेची मागणी

0
122

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहातील अवाजवी भाड्यासह इतर समस्या सोडवाव्यात, यासह रंगकर्मींच्या विविध मागण्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने केल्या. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना आज (गुरुवार) याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की केशवराव भोसले नाट्यगृह नाट्यगृहातील रंगकर्मींना एका प्रयोगासाठी ५ हजार भाडे आकारण्यात यावे. मागील काही वर्षांपूर्वी या नाट्यगृहाचे नूतनीकरण होऊनही या नाट्यगृहातील समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे त्याही समस्या सोडवाव्यात.

या वेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह गिरीश महाजन, विद्यासागर अध्यापक, अभिनेते स्वप्नील राजशेखर, संजय मोहिते, धनंजय पाटील, मुकुंद सुतार, किरण चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, रंगकर्मी उपस्थित होते.