कळे येथे घुबडाच्या पिल्लाला निसर्गप्रेमींनी दिले जीवदान…

0
13

कळे (प्रतिनिधी) : कळे काहीजणांनी मासेमारीसाठी एका ओढ्यात जाळे लावले होते. या जाळ्यात अडकलेल्या एका घुबडाच्या पिल्ल्याला वन विभागाचे कर्मचारी आणि निसर्गप्रेमींनी जीवदान दिले.

कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील मरळी पुलाजवळ ओढ्यात एका झाडावर हे पिल्लू जाळ्यात अडकले होते. त्याची सुटकेसाठी धडपड सुरु होती. यावेळी फिरायला गेलेल्या  कळे येथील निसर्गप्रेमी दीपक पाटील यांना हे पिल्लू दिसले. याबाबत त्यांनी वनविभागाला याची कल्पना दिली. वनरक्षक बाजीराव देसाई यांनी तात्काळ घटनास्थळी ओढयामधील झाडावर चढून घुबडाचे पिल्लू सुखरुप बाहेर काढले. यासाठी दीपक पाटील, विशाल पाटील या निसर्गप्रेमींनी मदत केली.