कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे 9 व्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन (एनसीएसआय) चे आयोजन दि. १७ आणि १८ नोव्हेंबररोजी करण्यात येणार आहे. ही वार्षिक राष्ट्रीय परिषद पीआयसीचा मुख्य उपक्रम असून कोविड महामारीमुळे यंदा व्हर्च्युअल पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.

देशभरातून १४० अर्जांमधून अंतिम फेरीसाठी आदिवासी, ग्रामीण आणि शहरी श्रेणींमध्ये सामाजिक नवसंकल्पनांसाठी १८ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. टाटा केमिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मुकुंद रामकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर माणदेशी बँक व फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष चेतना गाला सिन्हा या समारोप प्रसंगी बीजभाषण करतील.

ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद सर्वांसाठी खुली असून व्हर्च्युअल पध्दतीने यात सहभागी होण्यासाठी झूम लिंकवर संपर्क करावा.

बुधवार, १७ नोव्हेंबर, वेळ – दुपारी ३:०० ते ६:००

झूम लिंक -https://us06web.zoom.us/j/87515040554

गुरूवार, १८ नोव्हेंबर, वेळ – दुपारी ३:०० ते ६:००

झूम लिंक – https://us06web.zoom.us/j/89358026963

यंदाच्या राष्ट्रीय परिषदेत छत्तीसगड, झारखंड, मेघालय आणि नागालँडसह भारतभरातील २४ राज्यांमधून प्रवेशिका आल्या आहेत. यावर्षीच्या १८ अंतिम स्पर्धकांनी सादर केलेल्या संकल्पनांमध्ये पर्यावरणशास्त्र, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, कृषी, दिव्यांग व्यक्तींचे सशक्तीकरण, बांधकाम आणि अक्षय ऊर्जा इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.