‘श्रमशक्ती जीवन गौरव’ पुरस्काराने नथानियल शेलार यांचा गौरव

0
148

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने निर्मिती व्यवस्थापक, ज्युनिअर आर्टिस्ट सप्लायर नथानियल शेलार (ज्युनिअर धुमाळ) यांना राज्यस्तरीय ‘श्रमशक्ती जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. इचलकरंजीच्या घोरपडे नाट्यगृहात ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे (गुरुजी), सिने अभिनेत्री सुरेखा कुडची, छाया सांगावकर यांच्या उपस्थितीत कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन शेलार यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनी श्रमशक्ती संस्थेने आजवर केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून पुरस्कार प्राप्त गुणीजनांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सिनेअभिनेत्री सुरेखा कुडची, छाया सांगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मेघा घाडगे, झी मराठी फेम छाया सांगावकर, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सहनिर्माते रामभाऊ लामदाडे, अमित काकडे, प्रमोद परीट, सुवर्णा काकडे,  यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.