नाशिकचे सुपूत्र असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव शहीद

0
63

मुंबई (प्रतिनिधी) : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या एका आयईडी स्फोटात नाशिकचे सुपूत्र असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव शहीद झाले. तर सीआरपीएफ कोबरा २०६ बटालियनचे ७ जवान जखमी झाले आहेत. पेट्रोलिंग करीत असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला.

नितीन भालेराव या स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भालेराव हे नाशिकमधील इंदिरानगरमध्ये राहत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरात शोककळा परसरली आहे.

पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितले की, सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला गावाजवळ आयईडी स्फोट घडवून आणला. यामुळे सीआरपीएफचे कोबरा बटालियनमधील अनेक जवान जखमी झाले.